राजाराम महाविद्यालयातील दुर्मिळ ग्रंथसंपदेचे जतन आणि संवर्धन करा: पालकमंत्री


कोल्हापूर • प्रतिनिधी 
     पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजाराम महाविद्यालयाला भेट देऊन महाविद्यालयातील कामकाज आणि सुविधांबाबत आढावा बैठक घेतली.  महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.बाळकृष्ण ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथसंपदेची पाहणी करून डिजीटायझेशन करून या ग्रंथसंपदेचे जतन आणि संवर्धन करण्याची सूचना केली. याबाबतचा प्रस्ताव तात्काळ पाठवावा, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही ना.पाटील यांनी दिली.
     ना. पाटील यांनी या भेटीवेळी  महाविद्यालयाच्या कामकाजाविषयी  सविस्तर माहिती घेतली. प्राचार्य डॉ. ए.एस. खेमनार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महाविद्यालयाला दिलेल्या निधीतून करण्यात आलेल्या भौतिक सुविधांची माहिती दिली. राजाराम महाविद्यालय हे जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय आहे की ज्याला जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला जातो. गतवर्षी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात आलेल्या कामांची यावेळी ना.पाटील यांनी पाहणी केली. राजर्षी शाहू सभागृह, संगणक लॅब आणि अभ्यासिका याची त्यांनी पाहणी केली.  तसेच यावर्षीची जी प्रस्तावित कामे आहेत त्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगून त्यासाठीसुद्धा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वस्त केले.
     पालकमंत्री सतेज पाटील यांनी   महाविद्यालयामधील प्राचार्य डॉ. बाळकृष्ण ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथसंपदेची पाहणी केली. या  ग्रंथसंपदेचे जतन आणि संवर्धन करावे अशी सूचना ना.पाटील यांनी केली.  सुरुवातीच्या टप्प्यात याचे लॅमिनेशन करून घ्यावे आणि पुढील टप्प्यात स्कॅनिंग करून डिजीटायझेशन करावे.  तसेच या हे दुर्मिळ संदर्भ ग्रंथ माफक फीमध्ये महाविद्यालयाबाहेरील  विद्यार्थ्याना संशोधन आणि अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्याची सूचना केली.
      प्राचार्य डॉ. ए.एस. खेमनार यांनी महाविद्यालयातील या ग्रंथालयात विविध भाषेतील स्वतंत्रपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील सुमारे १२ हजार दुर्मिळ ग्रंथ असल्याची माहिती दिली.
     यावेळी श्रीराम पवार, विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड, डॉ. एल. डी. जाधव, प्रा. संजय पाठारे, प्राचार्य डॉ. महादेव नरके उपस्थित होते.
———————————————– Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *