प्रिया पाटील हिच्या सेवाभावाचा शिवाजी विद्यापीठातर्फे गौरव

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     प्रिया पाटील हिने कोरोना कालखंडामध्ये सेवाभावाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तिचे मदतकार्य सर्व तरुणाईसाठी कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी गौरव केला.
     शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वयंसेविका असलेली प्रिया पाटील ही सध्या कोल्हापूरमध्ये कोविड-१९मुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांचे मृतदेह वाहून नेणाऱ्या शववाहिकेवर चालक म्हणून सेवा देत आहे. गेल्या दीड महिन्यांपासून अत्यंत सेवाभावी वृत्तीने ती कोरोना काळात अखंड कार्यरत आहे. कोरोनाबधितांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यापर्यंत तसेच कोरोनाग्रस्तांच्या निधनानंतर मृतदेहाला शववाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत नेऊन प्रसंगी अंत्यसंस्कार करण्याचे कामही करत आहे. आजपर्यंत २४० हून अधिक मृतदेह वाहून नेऊन त्यांच्यावर तिने अंत्यसंस्कार केले आहेत.
     प्रिया पाटील हिच्या या कार्याबद्दल शिवाजी विद्यापीठात आज सकाळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते तिचा ग्रंथभेट देऊन सत्कार केला.
    यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक अभय जायभाये, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, कार्यक्रम अधिकारी डॉ.एच बी. पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा.संदीप पाटील, अधीक्षक चंद्रशेखर दोडमणी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!