.
कोल्हापूर • प्रतिनिधी
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या मेडिकल फार्मकॉलॉजी विभागाच्या प्रा. डॉ.सुनिता एस. पाटील यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून पीएच. डी. जाहीर झाली आहे.
डॉ. सुनिता पाटील यांनी ‘ईफेक्ट ऑफ हार्ट ऑफ हेमॅटोलॉजीकल प्रोफाईल अँड ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस इन एचआयव्ही निगेटिव्ह पेशंट’ या विषयावरील शोधनिबंध सादर केला होता. त्यांना डॉ. व्ही. एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. सुनीता पाटील यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष गृह राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी अभिनंदन केले आहे