प्रा. के. एम. गरडकर यांना जागतिक शास्त्रज्ञांमध्ये स्थान


कोल्हापूर • प्रतिनिधी
     ए. डी. सायंटिफिक इंडेक्स या संस्थेने जाहीर केलेल्या सर्वेक्षणात शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. के. एम. गरडकर यांना जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान मिळाले आहे.
     या संस्थेमार्फत जगातील नामांकित शास्त्रज्ञांची गूगल स्कॉलरचा आधार घेऊन यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शोधनिबंध, एच इंडेक्स, आय टेन इंडेक्स अशा संशोधन संबंधित सर्व बाबींच्या निकषाच्या साहाय्याने हि क्रमवारी ठरविली आहे. या जागतिक क्रमवारीत प्रा. गरडकर यांना नॅचरल सायन्स/केमिकल सायन्स या विषयात मानांकन मिळाले असून त्यामुळे विद्यापीठाच्या लौकिकात भर पडली आहे.
      प्रा. गरडकर यांनी आजपर्यंत संशोधन क्षेत्रात भरीव योगदान दिले असून १५० हून अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या संशोधनासाठी जवळपास ४००० सायटेशन, ३७ एच इंडेक्स, ८७ आय इंडेक्स मिळाले आहेत.  
     गतवर्षी प्रा. गरडकर यांची महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सेस फेलोपदी निवड झाली आहे. प्रा. गरडकर यांनी नॅनोमटेरिअल्सवर संशोधन करून अर्ध्यातासात रंगमिश्रित पाणी सूर्यप्रकाशाच्या मदतीने शुद्ध करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे व तसेच पाना-फुलांच्या मदतीने बहुउपयोगी नॅनोमटेरिअल्स उदा. झिंक ऑक्साइड, टिटॅनियम ऑक्साइड, झिरकोनियम ऑक्साइड, सोने चांदी यांचे सूक्ष्म धातुकण तयार केलेले आहेत. या सर्वांचा उपयोग पाणी शुद्धीकरणासाठी, बायोमेडिकल तसेच रसायनाचे पृथःकरण करण्यासाठी केला जातो. आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ विद्यार्थ्यांना पी.एचडी पदवी मिळाली असून ८ विद्यार्थी विविध विषयावर संशोधन करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *