घोडावत विद्यापीठाच्या प्रा.महांतेश मठद यांना पीएच. डी पदवी प्रदान

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय घोडावत विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग विभागाचे प्रा.महांतेश परमेश्वरैया मठद यांना विश्वेश्वरैया टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ, बेळगाव यांच्याकडून नुकतीच पीएच.डी पदवी प्राप्त झाली.
     ” डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ डिफरंट टोपोलॉजीस ऑफ टाईम टू डिजिटल कन्व्हर्टर्स फॉर लो वोल्टेज ऍप्लिकेशन्स” हा त्यांच्या पीएच.डी चा मुख्य विषय होता. प्रा. मठद यांना विश्वेश्वरैया टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे संशोधन मार्गदर्शक डॉ.हंसराज गुहिलोट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. मठद यांनी तयार केलेल्या टाईम टू डिजिटल कन्व्हर्टर्स या ऍप्लिकेशन चा उपयोग पेटस्कॅन, एमआरआय, सीटी स्कॅन, स्पेक्ट्रोस्कोपी, थ्री डी कॅमेरा तसेच विविध क्षेत्रात होणार आहे.
     डॉ.महांतेश मठद यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण राजनहाळली हरिहरमध्ये झाले. नंतर त्यांनी तुमकूर येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंगमध्ये पदवी धारण केली असून पुढे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण अर्थातच एम. टेक. इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग केएलई विद्यापीठातून पूर्ण केले. तसेच यानंतर त्यांनी २०२१ साली विश्वेश्वरैया टेक्नॉलॉजिकल विद्यापीठातून आपले पीएच.डी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
     डॉ.महांतेश मठद हे नेहमी विद्यार्थीभिमुख कार्यक्रमात पुढाकार घेत असतात. विद्यार्थ्यांसाठी विविध विषयावर कार्यशाळा घेणे, टेक्निकल इव्हेंट्स राबविणे या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व कौशल्य वाढीसाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. याचबरोबर त्यांनी भागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये तज्ज्ञ व्याख्याता म्हणून विविध विषयावर व्याख्याने दिली आहेत.
      त्यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये ७ तर आंतरराष्ट्रीय परिषदेत ७ शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. ते इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन व इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनीअर्स या संस्थांचे आजीव सदस्य आहेत.
     संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्रभारी कुलगुरू डॉ. एम. टी. तेलसंग, प्रभारी कुलसचिव डॉ. एन. के. पाटील, संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी यांनी डॉ. मठद यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!