संजय घोडावत विद्यापीठाचे प्रा.परशराम पवार नेट परीक्षा उत्तीर्ण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतल्या जाणार्‍या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (नेट) निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत संजय घोडावत विद्यापीठाचे प्राध्यापक परशराम पवार यांनी यश संपादन केले आहे.
       संजय घोडावत विद्यापीठात पत्रकारिता आणि जनसंवाद विभाग आहे. या विभागाच्या स्थापनेपासून उभारणीत प्रा.पवार यांचे योगदान राहिले आहे. या विभागात सहाय्यक प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणुन ते काम पाहत आहेत. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी विभागामध्ये विविध उपक्रम व प्रकल्प राबविले जातात. प्रा. पवार यांनी विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि कौशल्य विकासासाठी मिडिया क्षेञातील दिग्गज मान्यवरांची व्याख्याने, विविध कार्यशाळा तसेच अभ्यास भेटीच्या आयोजनावर भर दिला आहे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बायोस्कोप’ या राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जाते.
       प्रा. पवार यांनी विद्यार्थ्यांना तात्विक ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिकातुन कौशल्ये आत्मसात करता यावीत यासाठी माध्यम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दिग्गजांचा अभ्यास मंडळात समावेश केलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रम निर्धारीत केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कार्यकुशलतेला चालना मिळत आहे.
प्रा.पवार हे वृत्तपत्रात लेखन,ग्राफीक डिझाईन, लघुपट, माहितीपट तसेच रेडीओ कार्यक्रमांची निर्मिती अश्या बऱ्याच बाबी कौशल्यपुर्णरित्या करतात. विद्यार्थ्यांना मिडिया कवरेजचा प्रत्यक्ष अनुभव यावा यासाठी विद्यापीठाच्या कार्यक्रमांचे मिडिया कवरेजची जबाबदारी प्रा.पवार यांनी विद्यार्थ्यांना दिली आहे. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळण्यास त्यांना मदत होते. यामध्ये प्रा. पवार यांचे मार्गदर्शन आणि योगदान राहिले आहे.
       या यशाबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरु डाॅ.अरूण पाटील, कुलसचिव डाॅ. विवेक कायंदे आणि अकॅडमिक डिन डाॅ.उत्तम जाधव यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!