…तर तीव्र आंदोलन करू : सकल मराठा शौर्यपीठ

Spread the love

 
कोल्हापूर • प्रतिनिधी
       मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी योग्य भूमिका जर या सरकारने घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा शौर्यपीठ कोल्हापूरच्यावतीने देण्यात आला आहे.
      सकल मराठा शौर्यपीठच्यावतीने शिवाजी चौक येथे आज मराठा आरक्षण रद्द करण्यात आल्याने आंदोलन करण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनप्रसंगी शौर्यपीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद  जाधव, प्रकाश सरनाईक, महादेव आयरेकर, मनोहर सौरप, विक्रम बाबा पवार, राजेन्द्र थोरावडे, नंदकुमार घोरपडे आदी उपस्थित होते.
       मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने त्यावर मराठा समाजातून अतिशय संतापजनक अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. आज सकल मराठा शौर्यपीठच्यावतीने आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार आज जरी आम्ही शांत बसून आंदोलन करत असलो तरीसुद्धा येत्या काळात जर का राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांनीसुद्धा या भूमिकेवर समन्वयाने एकत्रित काम करण्याची गरज आहे असे आमचे मत आहे आणि या विषयावर राजकारण विरहित चर्चा होण्याची गरज आहे. सध्या मात्र सत्ताधारी आणि विरोधकांच्याकडून मात्र एकमेकांवर दोषारोपाचा खेळ सुरू आहे असे वाटतंय तर ताबडतोब दोन दिवसात सुपर न्युमररी पद्धत असू दे किंवा पुनर्विचार याचिकाद्वारा असुदे जर का मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी योग्य भूमिका जर का या सरकारने घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा शौर्यपीठ कोल्हापूरच्यावतीने प्रसाद जाधव यांनी दिला.
      तसेच कायदा व सुव्यवस्थेचा जर काय काही प्रश्न निर्माण झाला तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही असासुद्धा इशारा शौर्यपीठाच्यावतीने  प्रशासनाला येथे देत असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!