काँग्रेसतर्फे केंद्र सरकार विरोधात ओबीसी आरक्षण रद्द झाल्याबद्दल निदर्शने

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे केंद्र सरकार विरोधात ओबीसी राजकीय (स्थानिक स्वराज्य संस्थेतील) आरक्षण मिळण्यासाठी जोरदार निदर्शने स्टेशन रोड येथे करण्यात आली. हे आंदोलन कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
      सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही त्यामुळे ओबीसीचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले. याला सर्वस्वी तत्कालीन देवेंद्र फडणवीस व केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे सामाजिक न्याय दिनी जनआंदोलन करण्यात आले.
       यावेळी सौ. सरलाताई पाटील, सौ. संध्या घोटणे, सचिन चव्हाण, संजय पवार वाईकर, तौफिक मुल्लाणी, संपतराव पाटील, मोहम्मद शरीफ शेख, किशोर खानविलकर, प्रदीप चव्हाण, शंकरराव पाटील, बाळासाहेब सरनाईक, दिपक थोरात, अक्षय शेळके, उमेश पोर्लेकर, आकाश शेलार, रणजित पवार, सुलोचना नाईकवाडे, तानाजी लांडगे, वैशाली महाडीक, सुजित देसाई, उज्वला चौगुले, लीला धुमाळ, शुभांगी साखरे, शिवानी यादव, सरफराज रिकीबदार, आनंदा करपे, विद्या घोरपडे, अशोक गायकवाड, यशवंत थोरवत, उदय पवार, ऋषिकेश पाटील, स्नेहा पाटील, दत्ता वाळके, बाळासाहेब जगदाळे, आनंदा पाटील, मुन्ना बेपारी, ॲड. संजय सरदेसाई, सुरेश कुराडे, रंगराव देवणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!