नामदार मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने महापालिकेला दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिकेला दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स प्रदान करण्यात आले. कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृह परिसरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.
     मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनची टंचाई ओळखून फाउंडेशनच्यावतीने पाचशेहून अधिक कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आली आहेत. सीपीआरसह कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर व दवाखान्यांना ही मशीन्स दिली आहेत.
     स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर म्हणाले, कोरोना महामारीत गेल्या दीड वर्षापासून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोरोना योद्धा म्हणून अथक संघर्ष करीत आहेत. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी केलेले काम हिमालय पर्वताएवढे आहे.
     यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड, महापालिका प्रशासक सौ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त निखील मोरे, सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, माजी नगरसेवक सर्वश्री विनायक फाळके, आदिल फरास, संदीप कवाळे, उत्तम कोराणे आदी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!