पीटीएमची प्रॅक्टीस क्लबवर मात

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
     केएसए चषक स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात पीटीएम (अ)ने प्रॅक्टीस फुटबॉल क्लबवर ३ विरूद्ध २ गोलने मात करून ३ गुणांची कमाई केली. त्यांचे एकूण १२ गुण झाले. कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघाने खंडोबा तालीम मंडळ (ब)वर एक गोलने निसटता विजय मिळवला.
      छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या केएसए चषक स्पर्धेच्या सहाव्या फेरीस बुधवारी प्रारंभ झाला. सिनियर सुपर ८ गटात आघाडी घेण्यासाठी पीटीएम आणि प्रॅक्टीस क्लबला सामन्यात विजय मिळविणे महत्वाचे असल्याने सुरूवातीपासूनच वेगवान खेळ झाला. प्रॅक्टीसकडून प्रतिक बदामे थेट फटक्यावर गोल नोंदवून १७ व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. पीटीएमच्या प्रथमेश हेरेकर, ऋषिकेश मेथे-पाटील, ओमकार जाधव यांनी गोलची परतफेड करण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. एका चढाईदरम्यान अक्षय पायमलने गोल करून ३७ व्या मिनिटास १-१ अशी बरोबरी साधली.
       उत्तरार्धात प्रॅक्टीसच्या राहूल पाटीलने ४५व्या मिनिटास गोल करून पुन्हा आघाडी घेतली पण पीटीएमकडून अक्षय पायमलने ५२ व्या मिनिटास गोल नोंदवून २-२ असा सामना बरोबरीत आणला. त्यानंतर आघाडी वाढवण्यासाठी प्रॅक्टीसच्या कैलास पाटील, सागर चिले, ओमकार मोरे तर पीटीएमच्या ऋषिकेश मेथे-पाटील, प्रथमेश हेरेकर, ओमकार जाधव,अक्षय मेथे-पाटीलने केलेल्या चढाया वाया गेल्या. अखेर ७४ व्या मिनिटास मिळालेल्या संधीचा फायदा उठवत प्रथमेश हेरेकरने गोल नोंदवून संघाला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला.
       तत्पूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात  पोलिस संघाने खंडोबा (ब)वर निसटता विजय मिळवला. पोलिस संघाच्या संकेत वेसनेकर याने उत्तरार्धात ७९ व्या मिनिटास गोल करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पोलिस संघाने १२ गुणासह आघाडी घेतली आहे.
             सहाव्या व सातव्या फेरीतील सामने पुढीलप्रमाणे:
• दि.१७: जुना बुधवार – पीटीएम (ब)
              फुलेवाडी – शिवाजी
• दि.१८: उत्तरेश्वर – झुंजार क्लब
              बालगोपाल – खंडोबा (अ)
• दि.१९: ऋणमुक्तेश्वर – सम्राटनगर स्पोर्टस
              दिलबहार – बीजीएम स्पोर्टस
• दि.२१: झुंजार क्लब – सम्राटनगर स्पोर्टस
              खंडोबा (अ) – बीजीएम स्पोर्टस
• दि.२३: उत्तरेश्वर – ऋणमुक्तेश्वर
              बालगोपाल – दिलबहार
• दि.२४: पोलिस संघ – पीटीएम (ब)
              पीटीएम (अ) – शिवाजी
• दि.२५: खंडोबा (ब) – जुना बुधवार
              प्रॅक्टीस – फुलेवाडी
——————————————————- Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!