जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ मिरजकर तिकटी येथे जाहीर सभा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री चंद्रकांत जाधव या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि.१) मिरजकर तिकटी येथे सायंकाळी सात वाजता जाहीर सभा आयोजित केली आहे. 
       शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शे.का.प., आर.पी.आय. (कवाडे गट, गवई गट, खरात गट), मा.क.पा., भा.क.पा. आणि मित्र पक्षाच्या (महाविकास आघाडी) उमेदवार जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव 
यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री सतेज पाटील, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व श्रीमंत  मालोजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती आहे.
       शुक्रवार दि.१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता मिरजकर तिकटी, कोल्हापूर येथे होणाऱ्या जाहीर सभेस सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर.के.पोवार, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारूगले, राष्ट्रीय कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे. 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!