पल्स पोलिओ लसीकरणाचे ४२६४७ बालकांना डोस

Spread the love
Attachments


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शासन आदेशाप्रमाणे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवारी (दि.३१) महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहरात राबविण्यात आली. या मोहिमेस शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. शहरात ४२६४७ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. 
      दरम्यान, पोलिओ रोगाचे समूळ उच्चाटन करणेसाठी या मोहिमेमध्ये दि. ३१ जानेवारी २०२१ रोजी ज्या बालकांनी पोलिओ डोस घेतले नसतील त्या बालकांना दि. १ ते ५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत घरभेटीच्या माध्यमातून शोध घेऊन डोस पाजण्यात येणार आहेत.
     या मोहिमेचे उद्घाटन उपायुक्त – २ निखील मोरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे सकाळी ८ वाजता करण्यात आले. याप्रसंगी आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, आरसीएच नोडल ऑफिसर डॉ.अमोलकुमार माने, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलचे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश पावरा, रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, रोटरीचे प्रतिनिधी व भागातील नागरीक, आदी उपस्थित होते. तसेच पुणे राज्य लसीकरण अधिकारी डॉ.दिलीप पाटील, यांनी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथील लसीकरण केंद्रास भेट देऊन पल्स पोलिओच्या कामकाजाबाबत माहिती घेवून मार्गदर्शन केले.
     या मोहिमेमध्ये एकूण ४८६३८ बालकांना डोस पाजणेचे उद्दिष्ट होते त्यापैकी ४२६४७ इतक्या बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. या मोहिमेकरीता शहरात १७३ ठिकाणच्या ४४२ केंद्रात सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत डोस पाजण्यात आले. तसेच बसस्टॉप, रेल्वेस्टेशन, नाके व महालक्ष्मी मंदीर या ठिकाणी मुलांना डोस पाजण्यात आले.
     प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांकडील वैद्यकीय अधिकारी डॉ.रुक्सार मोमीन, डॉ.योगीता भिसे, डॉ.शोभा दाभाडे, डॉ.रुपाली यादव, डॉ.सोनाक्षी पाटील, डॉ.रती अभिवंत, डॉ.अर्पिता खैरमोडे, डॉ.सुनिल नाळे, डॉ.निखील पाटील, डॉ.विश्वनाथ खैरमोडे, डॉ.सुशिला पावरा तसेच आरोग्य कर्मचारी यांनी या मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणी केली. याप्रसंगी आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, तसेच आरसीएच नोडल ऑफिसर डॉ.अमोलकुमार माने यांनी दिवसभर केंद्रांना भेटी देऊन मोहिमेबाबत माहिती घेऊन केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
     या मोहिमेसाठी सीपीआर हॉस्पीटलकडील डॉक्टर्स, परिचारीका, नर्सिंग सेंटरकडील प्रशिक्षणार्थी परिचारीका, तसेच डॉ.डी.वाय.पाटील नर्सिंग इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल कॉलेज, जगद्गुरु पंचाचार्य मेडिकल कॉलेज, वेणुताई चव्हाण मेडिकल कॉलेज, स्वामी विवेकानंद नर्सिंग कॉलेज, महालक्ष्मी नर्सिंग स्कूल, संजीवनी नर्सिंग स्कूल, रोटरी क्लब, शहरातील तरुण मंडळे, महिला मंडळे, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये तसेच सेवा-भावी संस्था, एन.सी.सी., विद्यार्थी, महालक्ष्मी मंदिर देवस्थान समिती, रेल्वे विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आदींचे सहकार्य लाभले.

Je suis désolé de tous ces malheurs. Dans les deux cas, la statine est inutile et toxique. Merci de votre attention. Sur la base de ce vous me dites pas grand chose , il peut arrêter ce poison inutile sur une ou deux semaines en diminuant progressivement les doses … Si vous y croyez, tout va revenir à la normale ; peut-être un petit Viagra pour aider à redémarrer, faites-vous aider par le pharmacien. https://www.cialispascherfr24.com/ Vous êtes sur un bon cap.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!