पुणे पोलिस उपायुक्‍त मितेश घट्टे यांचे शिवाजी विद्यापीठात सोमवारी व्याख्यान

Spread the love

• ‘गुन्हेगारी बातम्या आणि पत्रकारांची जबाबदारी’ हा विषय
कोल्हापूर • प्रतिनिधी
     शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद अधिविभागातील पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्यावतीने सोमवारी (दि.२८) दुपारी ४ वाजता पुण्याचे पोलिस उपायुक्‍त मितेश घट्टे यांचे ‘गुन्हेगारी बातम्या आणि पत्रकारांची जबाबदारी’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान होणार आहे, अशी माहिती अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी दिली.
     इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मितेश घट्टे यांनी बी. ई. (मॅकेनिकल) ही पदवी प्राप्‍त केली. त्यांना अध्यापनाचा दहा वर्षांचा अनुभव आहे. २००८ मध्ये ते पोलिस उपाधीक्षकपदी रूजू झाले. ठाणे ग्रामीण, चिपळूण आणि कराड आदी ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे. पत्रकारांनी गुन्हेविषयक बातम्या संकलित करत असताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, याविषयी ते मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकारिता विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!