संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीसाठी महाराष्ट्रातून पहिला पाठिंबा रायगडचा

Spread the love

• अर्जावर उरणचे अपक्ष आ. महेश बालदी यांची पहिली सही
कोल्हापूर • प्रतिनिधी
      माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेसाठी अपक्ष म्हणून लढणार असल्याची घोषणा करताच महाराष्ट्रातून पहिला पाठिंबा रायगड जिल्ह्यातील उरण मतदारसंघाचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी जाहीर केला. आ. बादली यांनी संभाजीराजेंच्या उमेदवारी अर्जावर पहिली सही केली आहे.
       युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी (दि.१६) आमदार महेश बालदी यांच्या उरण येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी आमदार बालदी यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून पहिली स्वाक्षरी केली.
       यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले. तसेच राज्य समन्वयक अंकुश कदम व धनंजय जाधव यांनी महाराष्ट्रातील सर्व अपक्ष आमदारांना संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!