राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचा शहरातील छोट्या व्यापार्‍यांना आधार

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     राजारामपूरी व्यापारी असोसिएशनने कोल्हापूरातील पुरग्रस्त भागातील नुकसान झालेल्या अत्यंत छोट्या व्यापार्‍यांना आधार देण्याचा उपक्रम प्रेरणादायी असून अशा उपक्रमांमुळे अति छोटे व्यापारी पुन्हा सक्षमपणे व्यापार करतील, असा विश्‍वास कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी व्यक्त केला.
      राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या “एक हात सहकार्याचा, देऊ आधार व्यापार्‍यांना” या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
जिल्हाधिकारी रेखावार पुढे म्हणाले की, पुरग्रस्त व्यापार्‍यांच्या बँक कर्ज विषयक अडचणी सोडवण्याच्या सूचना दिल्या गेल्या असुन, विम्या संबंधी राज्य सरकारद्वारे विमा कंपन्यांना योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत. व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, शेतकरी व अन्य सर्वच पुरग्रस्त नागरिकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाईसाठी प्रशासन सकारात्मक असुन, लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल असे सांगितले.
     संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी संकल्पना मांडताना सांगितले की,  राजारामपुरी व्यापारी असोसिएशन व अन्य संस्थांच्या सहकार्याने पुरग्रस्त भागात विविध प्रकारची मदत पाठवली जात आहे. हे करत असताना अनेक अत्यंत छोट्या व्यापार्‍यांचे सर्वस्व पुरात नष्ट वा खराब झाल्याने त्यांचा उदरनिर्वाहच थांबल्याचे लक्षात आल्याने एक हात सहकार्याचा, देऊ आधार व्यापार्‍यांना हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.  मॅकॅनिक, पंक्चर व्यावसायिक, स्टेशनरी व्यवसाय करणारे व्यापारी, सलुन व्यावसायिक अशांना त्यांचा व्यवसाय पुर्ववत सुरु करता यावा यासाठी लागणारे साहित्य, स्टॉक आदी वस्तुरुपी सहाय्य करुन त्यांना सहकार्याचा आाधार दिल्याचे सांगितले.
पहिल्या टप्यात पाच छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायासाठीचे संपूर्ण साहित्य देण्यात आले असून भविष्यात अजुन व्यापक प्रमाणात उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
     याप्रसंगी चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव जयेश ओसवाल, असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत पोकळे, सहसचिव विजय येवले, कोषाध्यक्ष अनिल पिंजाणी, संचालक महेश जेवराणी, पियूष पारेख, ताराचंद देठीया, भरत रावळ, शैलेश ओसवाल, दर्शन गांधी व लाभार्थी उज्वला पुरेकर, अनिल आरेकर, नितीन महेंद्रकर यांच्यासह विविध व्यापारी उपस्थित होते.
——————————————————-

 Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!