लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानतर्फे राजर्षी शाहू जयंती साधेपणाने साजरी


कोल्हापूर • प्रतिनिधी
      राजर्षी शाहू महाराज यांची १४७ वी जयंती लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानतर्फे साधेपणाने साजरी करण्यात आली. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून साधेपणाने जयंती सोहळा झाला. बिंदू चौक येथे झालेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस मदन पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
     यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबा महाडिक, उपाध्यक्ष हिंदुराव हुजरे – पाटील, राजू सावंत, चंद्रकांत पाटील, वसंत लिंगनूरकर,अजित राडे, प्रसाद जाधव, शिवाजीराव लोंढे, रमाकांत आंग्रे, विलास भोंगळे तसेच राजमाता जिजाऊ ब्रिग्रेडच्या सुनीता पाटील, स्वाती मिठारी, शारदा पाटील, सुषमा डांगरे, सुवर्ण मिठारी, लता जगताप आदी उपस्थित होते.
          राजर्षी शाहू जीवनगौरव पुरस्कार…..
     दरम्यान, प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा “लोकराजा राजर्षी शाहू जीवनगौरव पुरस्कार” यावर्षी लोकराजा राजर्षी शाहू मालिकेचे लेखक, अभ्यासक व इतिहास संशोधक रमेश जाधव तसेच शववाहिकेचे सारथ्य करून कोविड काळात मोलाचं योगदान देणारी २१ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनी कु. प्रिया पाटील यांना जाहीर झाला आहे. कोविड विषाणूचा प्रादुर्भाव कमी होऊन जनजीवन सुरळीत झाल्यानंतर राजर्षी शाहू स्मारक भवन येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *