कोल्हापूर • प्रतिनिधी
दूरदृष्टीने अखंड समाजाला उज्वल भविष्याची दिशा देणारा द्रष्टा युगपुरुष, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे संस्थेच्या कार्यालयात साजरी करण्यात आली.
ज्येष्ठ कॅमेरामन नंदकुमार पाटील व संस्थेचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सहखजिनदार शरद चव्हाण रणजीत जाधव, रविंद्र गावडे, सतिश बिडकर, इम्तियाज बारगीर, मंजित माने, अरूण चोपदार, सदाशिव पाटील, सुरेंद्र पाटील, अजय कुरणे, सुनिल मुसळे, बबन बिरंजे, दिलीप काटे, प्रमुख व्यवस्थापक रविंद्र बोरगांवकर, सौ.नम्रता गोडबोले, सौ. ऐश्वर्या पाटील, अरुण पाटील, सिद्धेश मंगेशकर इत्यादी उपस्थित होते