राजे फाउंडेशनच्या विस्तारित कोविड केअर सेंटरचे उदघाटन

Spread the love

• १० ऑक्सिजन बेडसह ५० बेडची सुविधा
कोल्हापूर • प्रतिनिधी
      वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राजे फाउंडेशनच्या विस्तारित कोविड केअर सेंटरचे उदघाटन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांच्या हस्ते झाले.
      राजे फाउंडेशनमार्फत शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर २५ बेडचे कोविड केअर सेंटर काही दिवसांपूर्वी सुरू केले होते. हे सर्व बेड फुल्ल झाले आहेत. वाढत्या रूग्ण संख्येमुळे  नातेवाईकांकडून बेडसाठी वारंवार विचारणा होत आहे. त्यामुळे बेडअभावी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी राजे फाउंडेशनमार्फत आणखी २५ बेड वाढविण्यात आले आहेत. आता या विस्तारित केअर सेंटरमध्ये १० ऑक्सिजन बेडसह ५० बेड उपलब्ध झाले आहेत. एक ऑक्सिजन काँन्सट्रेटर उपलब्ध आहे. याशिवाय रुग्णांना सवलतीच्या दरात भोजन व्यवस्था केली आहे. आतापर्यंत १५ रूग्ण यशस्वीपणे उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे  कागल, करवीर तालुक्यासह सीमाभागातील रूग्णांची होणार आहे.
      यावेळी कोविड केअर सेंटरचे डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. तुषार भोसले, डॉ. महेंद्र पाटील, सैफ शेख, साहिल अन्सारी, शाहू साखर कारखान्याचे संचालक युवराज पाटील, यशवंत माने, सचिन मगदूम आदी उपस्थित होते.
      वैद्यकीय कर्मचारी झाले भावूक…..
    सौ. नवोदिता घाटगे यांनी या कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. आपण जीव धोक्यात घालून करत असलेली रुग्णसेवा कौतुकास्पद आहे. याठिकाणी सेवा देत असताना आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच कुटुंबियांचीही काळजी घ्यावी, असे त्यांनी भावनिक आवाहन केले, त्यामुळे हे कर्मचारी भावूक झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!