हृदय शस्त्रक्रियेकरिता दाखल मुलांची राजेश क्षीरसागर यांनी केली आपुलकीने विचारपूस

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       कोरोना संसर्गाने सर्वांचीच आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. एकीकडे आर्थिक संकट तर दुसरीकडे मुलांना जन्मजात हृदयरोग अशा गंभीर परीस्थित अडकलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पालकांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आधार दिला आहे.
       शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील सुमारे १२२  मुलांची मोफत 2डी इको तपासणी करण्यात आली होती. यातील काही मुलांवर हृदय शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे निदान झाले होते. या मुलांवर राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून मुंबई येथील प्रसिद्ध नारायणा हॉस्पिटल येथे मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यातील अत्यावश्यक आठ मुलांना मोफत शस्त्रक्रियेकरिता दोन दिवसांपूर्वी नारायणा हॉस्पिटल, मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे. दाखल झाल्यानंतर या मुलांची प्राथमिक तपासणी करून पुढील उपचार सुरु करण्यात आले आहेत.
      शुक्रवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि शिवसेना कोल्हापूर जिल्हा संर्पकप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी नारायणा हॉस्पिटल येथे मुलांची व पालकांची भेट घेवून आपुलकीने विचारपूस केली. यावेळी या मुलांवर करण्यात येणाऱ्या उपचार पद्धतीची आणि शस्त्रक्रियेची माहितीही जाणून घेतली.
      मुंबईत नारायणा हॉस्पिटल येथे दाखल झालेल्या मुलांना व त्यांच्या सोबत असणाऱ्या पालकांना येण्या-जाण्यासहित शस्त्रक्रियेकरिता दाखल कालावधीत मोफत राहण्यासह, जेवणाचीही सुविधा राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांची व पालकांची श्री. क्षीरसागर यांनी भेट घेवून आपुलकीने विचारपूस केल्यानंतर पालकांनी राजेश क्षीरसागर यांचे मनःपूर्वक आभार मानत आपुलकीच्या भेटीबद्दल भावूक उद्गार व्यक्त केले.
      यावेळी नारायणा  हॉस्पिटलचे डॉ. सुप्रमित सेन, डॉ. योगेश खाचंदे, डॉ. अवि शहा, डॉ. अमित नागपुरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!