राजेश नाईक यांची कसबा बावडा परिसरात प्रचारफेरी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार राजेश उर्फ बाळ नाईक यांची कसबा बावडा परिसरात प्रचारफेरी पार पडली. यावेळी उमेदवार राजेश नाईक यांनी मतदारांशी संवाद साधला.
      गुरुवारी (दि.३१) सकाळी नऊ वाजता कसबा बावडा येथील भगवा चौक येथून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शेतकरी संघटनेचे उमेदवार राजेश नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात प्रचारफेरी काढली. पक्षाचे ध्वज घेऊन सहभागी झालेले कार्यकर्ते उमेदवार राजेश नाईक यांचा जयघोष करीत होते. तसेच घरोघरी प्रचाराची पत्रके वाटून उमेदवार राजेश नाईक यांच्या “किटली” या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले.
      लाईनबाजार व रमणमळा परिसर येथील प्रचारफेरीत माणिक शिंदे, भीमराव केरबा नाईक, सुदर्शन कोपर्डी, राजाराम नाईक, पांडुरंग कांबळे, शिवाजी चव्हाण, जयेश जत्राटे पाटील, चंदाराणी जत्राटे पाटील, उत्तम पाटील, रेश्मा शिंदे, नीलम बिरादर, माया फुटाणे, विद्या पाटील आदी सहभागी झाले होते.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!