पीआरएसआय – मुंबई चॅप्टर अध्यक्षपदी राजीव गोयल; सहसचिवपदी भोसले

Spread the love

  
कोल्हापूर • प्रतिनिधी
      पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया (पीआरएसआय) या देशातील जनसंपर्क क्षेत्रातील शिखर संस्थेच्या मुंबई चॅप्टरची नवीन कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अजीत पाठक यांनी नुकतीच जाहीर केली आहे. नवीन कार्यकारणीत अध्यक्षपदी ‘एचपीसीएल’चे मुख्य महाव्यवस्थापक (सांघिक संवाद) राजीव गोयल यांची तर उपाध्यक्षपदी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.चे महाव्यवस्थापक (सांघिक संवाद) अलोक कुमार सिंह यांची निवड झाली असल्याची माहिती या कार्यकारणीत निवड झालेले नूतन सहसचिव महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी दिली.
     नवीन कार्यकारणीत सचिवपदी नेहरू विज्ञान केंद्राचे सुहास नाईक-साटम तर कोषाध्यक्षपदी ‘आरबीआय’च्या माजी  व्यवस्थापक (सांघिक संवाद) सबिता बाडकर यांची नियुक्ती झाली आहे.  याचबरोबर समितीत सदस्य म्हणून राज्यपाल भवनचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, मुंबई विद्यापीठातील पत्रकारिता विभागाच्या प्रा.दैवता चव्हाण-पाटील, फुलब्राईट नेहरू फेलो डॉ. पुष्पेंदर भाटीया, विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्चच्या प्रा.उमा भूषण, व्हीएफएस ग्लोबलच्या उपाध्यक्षा सुकन्या चक्रबर्ती, ॲड फक्टर्सचे उपाध्यक्ष नौमान कुरेशी यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती सहसचिव विश्वजित भोसले यांनी दिली.
——————————————————-

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!