राजर्षि शाहू आघाडीचा प्रचार शुभारंभ


कोल्हापूर • प्रतिनिधी
      रामनवमीचा मुहूर्त साधत कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत सत्तारूढ राजर्षि शाहू आघाडीने प्रचाराचा शुभारंभ केला.
     कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार पी. एन. पाटील व जिल्ह्याचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व जेष्ठ संचालक अरुण नरके हे नेतृत्व करत असलेल्या सत्ताधारी राजर्षि शाहू आघाडीचा प्रचार शुभारंभ बुधवारी सकाळी गोकुळ शिरगाव येथील गोकुळ प्रकल्प येथे संस्थापक कै.आनंदराव पाटील – चुयेकर यांच्या पुतळ्यास  अभिवादन करून करण्यात आला.
      काल सत्ताधारी राजर्षि शाहू आघाडीची घोषणा होताच आज सर्व उमेदवारांनी गोकुळ येथे संस्थापक कै. आनंदराव पाटील – चुयेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण नरके यांनी सर्व उमेदवारांनी निवडणुकीच्या काळात एकत्रितरित्या काम करून विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे असून पुन्हा एकदा गोकुळवर आपला झेंडा फडकवायचे असल्याचे सूतोवाच केले.
      यावेळी गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे, माजी चेअरमन जेष्ठ संचालक  रणजितसिंह पाटील, जेष्ठ संचालक विश्वास जाधव तसेच संचालक धैर्यशील देसाई, दिपक पाटील, पी.डी.धुंदरे, उदय पाटील, बाळासो खाडे, अंबरीशसिंह घाटगे, सत्यजित पाटील, विलास कांबळे, संचालिका अनुराधा पाटील याचबरोबर उमेदवार सदानंद हत्तरकी, चेतन नरके, धनाजीराव देसाई, प्रकाशराव चव्हाण,  प्रतापसिंह पाटील, राजाराम भाटळे, रवीश पाटील, रणजीत पाटील व शौमिका महाडिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *