कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे कसबा बावड्यातील राजर्षी शाहू विद्यामंदिर, शाळा क्रमांक ११ हे आरोग्य अधिकारी नंदकुमार पाटील व केंद्र मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांच्या नियोजनबद्ध तयारीने आज शाळा सुरू होण्यापूर्वी सॅनिटायझर करून घेण्यात आले.
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी शाळा सुरू करण्यापूर्वी स्वच्छता, वर्ग सॅनिटायझर करणे, पाणी स्वच्छता या संदर्भात सूचना केल्याप्रमाणे शैक्षणिक पर्यवेक्षक उषा सरदेसाई, बाळासाहेब कांबळे,विजय माळी यांच्या देखरेखीखाली संपूर्ण शाळा सॅनिटायझर करण्यात आली. कसबा बावडा आरोग्य अधिकारी नंदकुमार पाटील,आरोग्यरक्षक मनोज कुरणे,सागर बेडेकर, अजमिर शेख, शाळेचे केंद्रमुख्याध्यापक अजितकुमार पाटील, शाळा व्यवस्थापन सदस्या वैशाली कोरवी, दीपाली चौगले,तमेजा मुजावर, सुजाता आवटी,मंगल मोरे यांनी मास्क, सॅनिटायझर, पाणी , साबण यांचा वापर करून संपूर्ण शाळा सॅनिटायझर करण्यात आली.
मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी मास्क व सॅनिटायझर का वापरावे यासंदर्भात माहिती दिली. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून देत असताना शाळेतील सुचनांचा वापर करावा असे आवाहन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक यांच्यात शासन आदेश प्राप्त होताच शाळा कशाप्रकारे भरविता येईल याची चर्चा करण्यात आली.