गोकुळ सत्तारूढ आघाडीला राजू शेट्टी व अशोक चराटी यांचा पाठिंबा


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडी आणि विरोधी आघाडीत चुरस वाढली आहे. बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी तसेच अशोक चराटी यांनी सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा देत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
     यावेळी सत्तारूढ आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील तसेच माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, अरूण नरके, सावकार मादनाईक आदी उपस्थित होते.
      पत्रकार परिषदमध्ये माजी खास. राजू शेट्टी यांनी आपण सत्तारूढ आघाडीबरोबर जात असल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, गतवर्षी कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लॉकडाऊन होते. अशा संकटाच्या काळात दूधाला चांगला भाव  दिला. तसेच भविष्यात गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट होणार नसल्याची खात्री मिळाली असल्याने आम्ही या आघाडीला पाठिंबा दिला आहे.
      माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेला पाठिंबा हा लाख मोलाचा आहे. त्याचा परिणाम येत्या २ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल, असे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी राजू शेट्टी यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सांगितले.
      प्रास्ताविक माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केले. गोकुळ निवडणुकीत सत्तारूढ पॅनेल प्रचंड मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
     दरम्यान, अरूण नरके यांनी राजू शेट्टी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच संजयबाबा घाटगे यांनी अशोक चराटी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *