विनामास्क व सोशल डिस्टंन्स न पाळणाऱ्या नागरिकांची रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
      शहरामध्ये संचारबंदी आहे, परंतु अत्यावश्यक कामाच्या नावाखाली नागरीक गर्दी करत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मोबाईलव्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्याच्या सुचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे बिंदू चौक येथे आज विनामास्क व सोशल डिस्टंन्स न पाळणाऱ्या व गर्दी करणाऱ्या ५१ नागरिकांची मोबाईलव्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. या सर्व नागरीकांचे अहवाल निगेटिव्ह आले.
     राज्यात तसेच शहरामध्ये संचारबंदी लागू आहे. अत्यावश्यक कामाचे नावाखाली नागरीक बाहेर पडून गर्दी करत आहेत. दुकान, बँक, भाजी मार्केट येथे नागरिकांची जास्त गर्दी होत आहे. या अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव व धोका लक्षात घेता शहरात मोबाईलव्हॅनच्या पथकाद्वारे रॅपिड ॲन्टीजन (कोवीड) टेस्ट करण्याबाबत नियोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!