कोल्हापूर • प्रतिनिधी
बँक रेग्युलेशन ॲक्ट, आर. बी. आय. आणि महाराष्ट्रातील सहकार खाते यांच्यात एकवाक्यता नसून रिजर्व बँक आणि केंद्र सरकारचे धोरण महाराष्ट्रातील सहकार चळवळीला बाधक आहेत, बँक रेगुलेटिंग ॲक्ट हा कायदा डोळे झाकून केला असून राजकीय हेतू लक्षात घेऊन कायदे करणे योग्य नसल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन च्या विद्यमाने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्यावतीने आरबीआय च्या धोरणाबद्दल हॉटेल सयाजी येथे नागरी सहकारी बँकाच्या संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ना. सतेज पाटील आणि महाराष्ट्र सहकारी बँक मुंबईचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील सरनाईक, सूर्यकांत बुधिहाळकर उपस्थित होते.
आर. बी. आय. ने केलेला बॅक रेगुलेटिंग ॲक्टमुळे महाराष्ट्रातले सहकार खाते धोक्यात आले आहे. बँक रेगुलेटीन ॲक्ट आर. बी. आय. आणि महाराष्ट्रातील सहकार खाते यांच्यात एकवाक्यता असणे गरजेचे आहे. केंद्र आणि आयआरबीचे धोरण महाराष्ट्राच्या सहकार खात्याला बाधक आहे. केवळ डोळे झाकून हा कायदा केला असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आरबीआयच्या कायद्याचा विरोध केला.
दरम्यान, महाराष्ट्रातील सहकार चळवळ टिकली पाहिजे, नागरी बँकाच अस्तित्व टिकलच पाहिजे यासाठी सहकार बँकांचे नेतृत्व करण्यास आम्ही तयार असून महाविकास आघाडी सरकार यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे ना. सतेज पाटील यांनी सांगितले.
नागरी सहकार बँक आणि आरबीआय च्या धोरणाबद्दल ना. सतेज पाटील यांनी पुढाकार घेऊन खासदार शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय मांत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत तीन दिवसीय सहकार परिषद आयोजित करावी अशी विनंती अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक शिरीष कणेरकर यांनी केली. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकांचे संचालक उपस्थित होते.
——————————————————-