वीज बिलाची थकबाकी वसूल करण्याची सुचना

• कोल्हापूर, सांगलीतील आढावा बैठकीत सुचना
कोल्हापूर • प्रतिनिधी
    वीजग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी वीज बिलाची थकबाकी वसूल करणे गरजेचे आहे. मार्चअखेर वीज बिल थकबाकी वसूली मोहिम गतिमान करून थकबाकी वसूल करावी, असे आदेश महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादीकर यांनी कोल्हापूर परिमंडळातील विविध विभाग कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिले आहेत. वीजग्राहकांनी थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन श्री.भादीकर यांनी केले आहे. ते दोन दिवस कोल्हापूर, सांगलीच्या दौऱ्यावर होते.
     श्री.भादीकर यांनी दि.१६ मार्च रोजी कोल्हापूर परिमंडळ कार्यालयासह जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर शहर विभागात संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंत्यांची थकबाकी वसूलीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. दि.१७ मार्च रोजी सांगली मंडळ कार्यालयात सांगली शहर व ग्रामीण विभाग, इस्लामपूर विभाग येथे संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंत्यांची थकबाकी वसूलीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली.
     श्री.भादीकर यांनी सदरच्या आढावा बैठकांदरम्यान कृषी धोरण २०२० च्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन  हे धोरण यशस्वी करण्यासाठी कृषी ग्राहकांना हे धोरण पटवून देत कृषी पंपाच्या थकबाकीतून मुक्त होण्यासाठी प्रवृत्त करावे, असे निर्देश दिले. या बैठकीस मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता
अंकुर कावळे, सांगलीचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांची प्रमुख उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *