पश्चिम महाराष्ट्रात थकीत वीजबिलांच्या वसुलीची मोहिम वेगात

• शनिवारी व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु
कोल्हापूर • प्रतिनिधी
     पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ३१ लाख ३७ हजार ३५० वीजग्राहकांकडे १२९० कोटी ६८ लाख रुपयांची थकबाकी असल्याने वसुली मोहिमेला वेग देण्यात आला आहे. सुट्टीच्या दिवशीही मोहिम सुरु राहणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
     दरम्यान, चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि.२६) व रविवारी (दि.२७) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.
      चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्यासाठी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु आहेत. तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या बिलांचा भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल ॲपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधीत वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशीलदेखील देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *