सार्वजनिक सुटी तसेच रविवारी काही मार्गांवरील बसेसच्या संख्येमध्ये कपात

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत सार्वजनिक सुटी, दुसरा व चौथा शनिवार तसेच सर्व रविवारी प्रवासी संख्येत घट होत असल्याने काही मार्गांवरील केएमटी बसेसच्या संख्येमध्ये कपात करण्यात आली आहे.
      आर.के.नगर ते शुगरमील, पाचगांव ते कदमवाडी, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर ते पेठ वडगांव, कळंबा ते शुगरमील / शिवाजी विद्यापीठ, जठारवाडी ते स्टँड व हणमंतवाडी ते वळीवडे या मार्गावरील केएमटी बसेसच्या काही कमी उत्पन्नाच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.
      तरी सर्व प्रवासी नागरीक, विद्यार्थी व सवलत पासधारकांनी या बदलाची नोंद घेऊन परिवहन उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन उपक्रमामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!