रिलायन्स आणि सनमीना भारतात जागतिक दर्जाचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र बनवणार

Spread the love

• ‘मेक इन इंडिया’मुळे इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर क्षेत्राला चालना मिळणार
कोल्हापूर • प्रतिनिधी
      रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड (RSBVL), रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आणि सनमीना कॉर्पोरेशन यांनी भारतात इलेक्ट्रॉनिक्स हब तयार करण्यासाठी संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स सनमीनाच्या विद्यमान भारतीय युनिटमध्ये १६७० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या संयुक्त उपक्रमात रिलायन्सचा ५०.१ टक्के हिस्सा असेल. तर व्यवस्थापन सध्याच्या सनमीना संघाच्या हातात राहणार आहे.
      ही संयुक्त भागीदारी 5G, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, हायपरस्केल डेटासेंटर्स यांसारख्या कम्युनिकेशन नेटवर्किंगला प्राधान्य देईल. हे आरोग्य प्रणाली, औद्योगिक आणि संरक्षण आणि एरोस्पेस सारख्या उद्योगांसाठी उच्च तंत्रज्ञान हार्डवेअर देखील तयार करेल. कंपनीने याचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ व्हिजनच्या अनुषंगाने केले आहे. हा संयुक्त उपक्रम सनमिनाच्या विद्यमान ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच सेवा देत राहील, तसेच एक अत्याधुनिक ‘मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी सेंटर ऑफ एक्सलन्स’ तयार करेल, जे भारतातील उत्पादन विकास आणि हार्डवेअर स्टार्ट-अपच्या इको-सिस्टीमला प्रोत्साहन देईल.
       रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड (RSBVL),या संयुक्त उपक्रम युनिटमध्ये ५०.१ % इक्विटी समभाग धारण करेल, तर उर्वरित ४९.९ % सनमीनाकडे असेल. RSBVL ही मालकी प्रामुख्याने सनमीनाच्या विद्यमान भारतीय विभागातील नवीन समभागांमध्ये रु.१६७० कोटी गुंतवणुकीद्वारे प्राप्त करेल. या गुंतवणुकीमुळे सनमीनाचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल. चेन्नईतील सन्मिनाच्या १०० एकर कॅम्पसमध्ये सुरुवातीला सर्व बांधकाम केले जाईल. भविष्यात त्यांचा विस्तारही होऊ शकतो.
      सनमीनाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युरे सोला म्हणाले की, आम्ही भारतात एकात्मिक उत्पादन कंपनी तयार करण्यासाठी रिलायन्ससोबत भागीदारी करण्यास अत्यंत उत्सुक आहोत. हे जेव्ही देशांतर्गत आणि निर्यात दोन्ही बाजारांच्या गरजा पूर्ण करेल आणि भारत सरकारच्या मेक इन व्हिजनला पूरक असेल आणि भारत हा मैलाचा दगड ठरेल.
      रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी म्हणाले की, भारतातील उच्च-तंत्रज्ञान उत्पादनाच्या महत्त्वाच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी सनमीनासोबत काम करताना आम्हाला आनंद होईल. स्वावलंबी होण्यासाठी भारताची वाढ आणि सुरक्षा आवश्यक आहे. दूरसंचार, आयटी, डेटा सेंटर, क्लाउड, 5G, नवीन ऊर्जा आणि इतर उद्योगांसाठी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनामध्ये आत्मनिर्भरता आवश्यक आहे कारण आपण एका नवीन डिजिटल अर्थव्यवस्थेत पुढे जात आहोत. या भागीदारीद्वारे, आम्ही भारतीय आणि जागतिक मागणी पूर्ण करताना भारतात नाविन्य आणि प्रतिभा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची योजना आखत आहोत.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!