रिलायन्स फौंडेशन व श्री चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळातर्फे धान्य किट वाटप


कोल्हापूर • प्रतिनिधी
     रिलायन्स फौंडेशन व श्री चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन अन्नसेवा या उपक्रमाअंतर्गत धान्य किट वाटप करण्यात आले.
     कोरोनमुळे संपूर्ण देशावरच संकट ओढवले असून अशा काळात एक सामाजिक जबाबदारी म्हणून रिलायन्स फौंडेशनच्यावतीने गरजू व्यक्तिंना मदत व्हावी या हेतूने मिशन अन्नसेवा हा उपक्रम संपूर्ण देशभर सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हयात या उपक्रमासाठी श्री चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळ सहकार्य करीत असून आतापर्यंत कोल्हापूर शहरासह उपनगरातील सुमारे दोनशे कुटुबियांना धान्य किटच्या माध्यमातून मदत पोचविण्यात आली आहे.
      कोरोना महामारीच्या काळात या दोन्ही सामाजिक संस्था ‘मदत नाही, कर्तव्य’ या भावनेने आपले कार्य करीत आहेत. आतापर्यंत सुमारे दोनशे कुटुंबियांना या उपक्रमार्तंगत सहकार्य करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने आपली नोकरी गमावलेले कामगार, रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले, वॉचमन, घरगुती मोलकरणी, तृतीयपंथी, गवंडी, सेंट्रीग कामगार, जेष्ठ नागरिक, बेघर यांचा समावेश आहे. सुमारे एक हजार गरजूपर्यत सदरची मदत पोचविण्याचे या संस्थांचे उद्दीष्ट असून भविष्यात इतर वर्गासाठी सहकार्य करण्याचा मानस आहे.
      या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आशिष कदम, विनायक पाटील, राजेंद्र मकोटे, अनिल निगडे, विशाल फुले, रविंद्र कोमटी, जितेंद्र कुबडे, बाबा नेर्ले, राजेंद्र शिंदे, दिपक शिंदे, युवराज तिवले, सौरभ सावंत, सतीश हवालदार, विशाल पवार, राजू आडनाईक, निशांत सुतार, अमर देसाई यांच्यासह अनेक सदस्य कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *