रिलायन्स जिओची नाविन्यपूर्ण योजना : वापरकर्ते घेऊ शकतील ‘इमर्जन्सी डेटा लोन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी 
     रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. आता जिओचे प्रीपेड वापरकर्ते रोजची डेटा मर्यादा संपल्यानंतर कंपनीकडून डेटा-लोन घेऊ शकतात. देशात प्रथमच कोणत्याही दूरसंचार कंपनीने डेटा-लोनची सुविधा सुरू केली आहे.
     डेटा-लोन १ जीबी पॅकमध्ये उपलब्ध असेल. वापरकर्त्यांना प्रत्येक पॅक ११ रुपये प्रति पॅक दराने डेटा लोन मिळेल. प्रत्येक वापरकर्ता एकूण ५ पॅक उदा. ५ जीबी डेटा-लोन घेऊ शकतो. दूरसंचार क्षेत्रासाठी ही एक क्रांतिकारी नाविन्यपूर्ण कल्पना आहे.
     “आता रिचार्ज करा आणि नंतर पे करा” या धर्तीवर ग्राहक प्रथम आपल्या गरजेनुसार डेटा लोन घेऊ शकेल आणि नंतर ते परत द्यावे लागेल. डेटा लोनचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य अट अशी आहे की, ग्राहकाकडे एक प्लॅन सक्रिय असावा. डेटा-लोन पॅकची वैधता; जोपर्यंत वापरकर्त्यांची विद्यमान योजना सक्रिय असेल तोपर्यंत राहील. म्हणजेच, जर ग्राहक ५ पॅक डेटा-कर्ज घेत असेल तर ग्राहकाची योजना जोपर्यंत सक्रिय असेल तोपर्यंत त्याची वैधता राहील.
     कंपनीचा असा विश्वास आहे की, प्रीपेड कनेक्शन वापरणारे बरेच ग्राहक विविध कारणांमुळे दररोज डेटा मर्यादा संपुष्टात आल्यानंतर तातडीने डेटा टॉप-अप करु शकत नाहीत, ज्यामुळे ते त्या दिवशी हाय स्पीड डेटापासून वंचित राहतात. ग्राहकांची सोय लक्षात घेऊन आता जिओने १ जीबी पॅकमध्ये डेटा-लोन देणे सुरू केले आहे.
                डेटा-लोन घेणे खूप सोपे…..
• मायजिओ अ‍ॅप उघडा आणि पृष्ठाच्या डाव्या बाजूला ‘मेनू’ वर जा
• मोबाइल सेवां अंतर्गत ‘इमर्जन्सी डेटा लोन’ निवडा
• ‘इमर्जन्सी डेटा लोन’ बॅनरवर क्लिक करा
• ‘इमर्जन्सी डेटा मिळवा’ हा पर्याय निवडा.
• ‘इमर्जन्सी डेटा लोन’ मिळविण्यासाठी ‘ऍक्टिव्हेट नाऊ’ वर क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!