रिलायन्स जिओकडून वेळेपूर्वीच स्पेक्ट्रमच्या रु.३०७९१ कोटींची पूर्तता

Spread the love

• जिओने सन २०३४-३५ पर्यंत दायित्वे भरली
मुंबई :
     रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (RJIL)ने दूरसंचार विभागाला ३०,७९१ कोटी रुपयांचे पेमेंट केले आहे. जिओने लिलावात घेतलेल्या स्पेक्ट्रमचे संपूर्ण दायित्व वेळेपूर्वीच भरले आहे. जिओने २०१४, २०१५, २०१६ मध्ये स्पेक्ट्रम घेतले होते आणि २०२१मध्ये जिओने भारती एअरटेलकडून देखील स्पेक्ट्रम विकत घेतले होते. कंपनीने हे सर्व दायित्व भरले आहे. या लिलाव आणि सौद्यांमध्ये कंपनीने ५८५.३ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विकत घेतले होते.
      दूरसंचार कंपन्यांसाठी डिसेंबर २०२१ मध्ये दूरसंचार विभागाकडून पॅकेज जाहीर करण्यात आले. ज्यामध्ये देयकाच्या अटी लवचिक होत्या. पण जिओने २०१६ मध्ये मिळालेल्या स्पेक्ट्रमशी संबंधित पेमेंटचा पहिला हप्ता ऑक्टोबर २०२१मध्येच भरला होता. २०१४ आणि २०१५ मधील लिलावामध्ये प्राप्त झालेल्या स्पेक्ट्रमची संपूर्ण स्थगित दायित्वे तसेच ट्रेडिंगद्वारे प्राप्त केलेल्या स्पेक्ट्रमच्या दायित्वांची जानेवारी २०२२मध्ये जिओने मुदतीपूर्वी भरपाई केली आहे.
      हे दायित्व आर्थिक वर्ष २०२२-२३ ते २०३४-३५पर्यंत वार्षिक हप्त्यांमध्ये देय होते आणि याचा व्याज दर ९.३०% ते १०% प्रतिवर्षं या दरम्यान होता. कंपनीचा अंदाज आहे की लवकर परतफेड केल्याने केवळ व्याजावर वार्षिक १२०० कोटी रुपयांची बचत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!