‘फोर्ब्स वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर’ मध्ये रिलायन्स देशात पहिल्या क्रमांकावर

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     फोर्ब्सने जगातील सर्वोत्तम एम्प्लॉयर २०२१ची वार्षिक यादी जाहीर केली आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ‘फोर्ब्स वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर – २०२१’ मध्ये देशात प्रथम क्रमांकावर आली आहे.
     रिलायन्स जागतिक स्तरावर ५२ व्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये ७५० बहुराष्ट्रीय आणि मोठ्या कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील एकूण १९ कंपन्यांनी या यादीत स्थान मिळवले आहे. आयसीआयसीआय बँक (६५ व्या), एचडीएफसी बँक (७७ व्या) आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज (९० व्या) क्रमांकावर आहेत.
     कोविड साथीच्या सर्वात वाईटकाळात ही कामगिरी करणे महत्त्वाचे आहे. कोविडच्यावेळी, जेव्हा व्यवसाय ठप्प होते, नोकऱ्या गमावल्या जात होत्या, अशा वाईट टप्प्यात, रिलायन्सने खात्री केली की कोणत्याही कर्मचाऱ्याचे वेतन कापले जाणार नाही. नोकरीची चिंता न करता तो काम करू शकत होता. तसेच त्याच्या वैद्यकीय गरजा आणि त्याच्या कुटुंबातील लसीकरणाचीही काळजी घेण्यात आली.
     दक्षिण कोरियाच्या सॅमसंगने जगातील सर्वोत्तम एम्प्लॉयर होण्याचे विजेतेपद पटकावले आहे. दुसऱ्या ते सातव्या स्थानावर अमेरिकन कंपन्यांचा कब्जा आहे. यामध्ये आय बी एम, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, अँपल, अल्फाबेट आणि डेल टेक्नॉलॉजीस सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यानंतर ८ व्या क्रमांकावर हुआवेई आहे, जी पहिल्या १० मध्ये समाविष्ट असलेली एकमेव चीनी कंपनी आहे. अमेरिकन अडोब ९ व्या क्रमांकावर आहे आणि जर्मनीचा बीएमडब्ल्यू ग्रुप १० व्या क्रमांकावर आहे.
      मार्केट रिसर्च फर्म स्टॅटिस्टासह भागीदारीमध्ये, फोर्ब्सने जगातील सर्वोत्तम नियोक्त्यांची वार्षिक यादी तयार केली आहे. रँकिंग निश्चित करण्यासाठी, स्टॅटिस्टाने बहुराष्ट्रीय कंपन्या आणि संस्थांमध्ये काम करणाऱ्या ५८ देशांतील १५०,००० कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले. यादीत समाविष्ट होण्यासाठी कंपन्यांना अनेक मापदंडांमधून जावे लागते. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या अनुभवांची गुणवत्ता आणि त्यांचे कंपनीचे मूल्यमापन आणि त्याच क्षेत्रातील इतर कंपन्यांविषयी त्यांचे मत जाणून घेतले जाते. ज्या कंपन्या यात पात्र आहेत त्यांनाच ही पदवी मिळते.
     कर्मचाऱ्यांसाठी रिलायन्सची धोरणे आणि कंपनीची कार्य संस्कृती यापूर्वीही अनेक मान्यता प्राप्त झाली आहे. अलीकडेच, कंपनीला ‘ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूट’ चा दर्जा मिळाला. कर्मचारी त्यांच्या व्यावसायिक कामात सर्वोत्तम आहेत याची खात्री करण्यासाठी, कंपनी कर्मचाऱ्यांना सतत मदत करते. ती तिच्या उत्कृष्ट कार्यासाठी लिंक्डइनच्या टॉप कंपन्यांच्या यादीचा भाग आहे. कंपनी आणि त्याच्या विविध व्यवसायांनी २०२०-२१ मध्ये अनेक एचआर उत्कृष्टता पुरस्कारदेखील जिंकले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!