कोल्हापूर • प्रतिनिधी
रिलायन्स रिटेल ‘स्वदेश’ हे विशेष स्टोअर लॉन्च करणार आहे, जे केवळ कारागिरांना समर्पित आहे. या स्टोअरमध्ये कृषी आणि खाद्य उत्पादने, हातमाग, कपडे, कापड, हस्तकला आणि हस्तनिर्मित नैसर्गिक उत्पादनांची विक्री केली जाईल, असे कंपनीने सांगितले आहे.
रिलायन्स रिटेलने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्टोअर “हँडमेड इन इंडिया” कार्यक्रमाला प्रोत्साहन देईल आणि कारागिरांनी बनवलेल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी जागतिक व्यासपीठ प्रदान करेल. पहिले स्वदेश स्टोअर २०२२ च्या उत्तरार्धात उघडण्याची अपेक्षा आहे.या कार्यक्रमाचे नेतृत्व स्वदेश, रिलायन्स रिटेलचा हस्तकला ब्रँड करत आहे, जे कारागिरांसाठी देशभरातील हस्तकला उत्पादनांसाठी एक पूर्णपणे समर्पित स्टोअर आहे.
रिलायन्स रिटेल, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ची उपकंपनी, स्थानिक कारागिरांना पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारांसोबत भागीदारीदेखील शोधत आहे.
याचा एक भाग म्हणून, कंपनीने गुरुवारी कोलकाता येथे बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
RRVLच्या संचालिका ईशा अंबानी म्हणाल्या की, भारतीय कला आणि हस्तकलेचे भविष्य एका रोमांचक वळणावर आहे. रिलायन्स रिटेल विविध स्थानिक ‘कलाकृती’ राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यासाठी विविध सरकारी संस्थांसोबत भागीदारी करत आहे.