जीर्ण झालेल्या नळ कनेक्शनच्या पाईप लाईन बदलून घेण्याचे आवाहन


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शहरातील मंजूर रस्त्याची कामे पूर्ण होण्यापूर्वी ज्या नळ कनेक्शनधारकांची नळ कनेक्शनच्या पाईप्स जीर्ण झाल्या आहेत. अशा सर्व नळ कनेक्शनधारकांनी त्या पाईप लाईन बदलून घ्याव्यात असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
     शहरातील गावठाण भागातील नागरिकांची नळ कनेक्शन ही फार जुनी असून त्याच्या पाईप गंजून जीर्ण झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे सदरच्या जीर्ण पाईप्समध्ये जमिनीमधील अन्य स्त्रोतामधून वाहणारे दुषित पाणी मिसळून काही ठिकाणी दुषित पाण्याच्या तक्रारी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये निश्चित दुषित पाण्याचे ठिकाण सापडणे अडचणीचे होऊन तक्रारीचे प्रमाण वाढत आहेत. तरी सर्व नळ कनेक्शनधारकांना कळविण्यात येते की, सध्या शहरामध्ये महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डांबरी रस्त्याची कामे सुरू आहेत. या रस्त्याची कामे पूर्ण होण्यापूर्वी ज्या नळ कनेक्शनधारकांची नळ कनेक्शन जुनी आहेत. ज्यांच्या नळ कनेक्शनच्या पाईप्स जीर्ण झाल्या आहेत. अशा सर्व नळ कनेक्शनधारकांनी त्यांच्या जीर्ण झालेल्या पाईप्स या विभागाच्या मान्यतेने बदलून घेणेत याव्यात. एकदा डांबरी रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर कोणतेही नळ कनेक्शन दुरूस्ती करीता रस्ता खुदाईस परवानगी दिली जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *