कोल्हापूर • प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ दूध प्रकल्प येथील कार्यस्थळावर गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण नरके यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना अरूण नरके यांनी संघाचे अधिकारी,कर्मचारी,दूध उत्पादक, शेतकरी,वितरक व ग्राहक यांना गोकुळ परिवारातर्फे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गोकुळ संघाच्या ताराबार्इ पार्क येथील कार्यालयाच्या आवारात संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक रणजितसिंह पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करणेत आले. तसेच जिल्हातील विविध ठिकाणी असणाऱ्या संघाच्या दूध शितकरण केंद्रावरही राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करणेत आले.
तावरेवाडी येथील शितकेंद्रावर संचालक आमदार राजेश पाटील, बोरवडे येथील शितकरण केंद्रावर विलास कांबळे, लिंगनूर येथील शितकरण केंद्रावर रामराजे देसार्इ-कुपेकर, गोगवे येथील शितकरण केंद्रावर संचालिका अनुराधा पाटील, शिरोळ येथील शितकेंद्रावर असि.मॅनेजर एस.जी.अंगज , कागल पशुखाद्य येथील सेंटरवर सहा. व्यवस्थापक मुजूमदार, गडमुडशिंगी पशुखाद्य येथील जेष्ठ कर्मचारी शिवाजी कांबळे या मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संघाचे कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, व्यवस्थापक-प्रशासन डी.के.पाटील, सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.