![]() | ![]() ![]() ![]() ![]() | ||
कोल्हापूर • प्रतिनिधी
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रविंद्र आडसूळ, निखिल मोरे, सहा.आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, सहाय्यक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, मुख्य लेखापरिक्षक वर्षा परिट, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, बाबूराव दबडे, रावसाहेब चव्हाण, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर, नगरसचिव सुनिल बिद्रे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, पर्यावरण अभियंता समिर व्याघ्राबंरे, मुख्याध्यापिका सौ.अंजली जाधव, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनी, अग्निशमन दलाचे जवान, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी सहा.आयुक्त विनायक औंधकर यांनी ‘जहॉ डाल डाल पर रहती है सोनेकी चिडीया वो भारत देश है मेरा’ हे देशभक्तीपर गीत गायले.
ध्वजारोहण कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका यांचे सामुहिक वाचन सहा.आयुक्त विनायक औंधकर यांनी केले