कोल्हापूर • प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत म्हणून ध्वजवंदन करण्यात आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते जिलेबीचे वाटप करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी देशाच्या पंतप्रधानांच्या उल्लेखनीय कार्याची माहिती देत आपण सर्वांनी आपल्या व्यस्त दिनक्रमामधून भारतीय जनता पार्टीच्या कार्यासाठी, सक्षम बूथ रचनेसाठी कार्यरत राहिले पाहिजे असे आवाहन केले.
भाजपा प्रवक्ते अजित ठाणेकर देशभक्तीपर गीत वाचन केले. त्याचबरोबर उत्तरेश्वर पेठ मंडल अध्यक्ष भरत काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरचिटणीस दिलीप मैत्राणी, हेमंत आराध्ये, मारुती भागोजी, राजू मोरे, विजय आगरवाल, सुधीर देसाई, संदीप कुंभार, सचिन तोडकर, विशाल शिराळकर, दिलीप बोंद्रे, अरविंद वडगावकर, प्रीतम यादव, सचिन सुतार, डॉ. आनंद गुरव, प्रमोदिनी हर्डीकर, महेश यादव, शाहरुख गडवाले, तानाजी निकम, विद्या बनछोडे, सुनिता सूर्यवंशी, सौ. सुषमा गर्दे, चिनार गाताडे, रोहित कारंडे, सौ. शिराळकर, राजेंद्र माळगे, ओंकार खराडे, अमित शिंदे, राजू बद्दी, विद्या बागडी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.