म़ौजे कणेरी येथील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा युवाशक्ती विकास पॅनेलला पाठींबा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     येथील राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सन २०२१-२६च्या  निवडणुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनेलने निवडणूक लढविली आहे. मौजे कणेरी येथील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी छत्रपाती शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला आहे.
     या निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनेलला भरघोस मतदान करून उमेदवारांना निवडून देवू, अशी भूमिका मौजे कणेरी येथील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली आहे. यापूर्वी सत्ताधारी व परिवर्तन पॅनेलने मौजे कणेरी येथील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना भेटवस्तू कधीही दिलीं नाही मग या सत्तारूढ ब परिवर्तन पॅनलला मतदान का करायचे असे सभासदांची भूमिका आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनलला पाठींबा दिला आहे.
    या पॅनेलचे उमेदवार अनिल सरदेसाई, अमित अवसरे, राजू सावंत, श्रीकांत कोरवी, शिवाजीराव फराकटे, रत्नमाला शिंदे आदींनी मौजे कणेरी येथील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांची भेट घेतली तेव्हा त्या सर्वांनी एकमुखी पाठींबा व्यक्त केला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!