रायडर गायत्री पटेल यांनी कोल्हापूरातून राइडला केली सुरुवात

कोल्हापूर • प्रतिनिधी
     येथील अनुभवी टू-व्हीलर रायडर गायत्री पटेल यांनी TVS Apache RTR 200 4V मोटरसायकलवरून आज वन ड्रीम, वन राइड इंडियन ओडिसीचा प्रारंभ केला आहे. सहा महिने कालावधीच्या त्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील MAI TVS येथे हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील , माजी महापौर निलोफर आजरेकर यांची उपस्थिती होती.
     महिलांच्या सुरक्षेविषयी जागृती करण्यासाठी आणि महिलांना रायडिंगमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्या देशभर प्रवास करणार आहेत, तसेच अठ्ठावीस राज्ये, आठ केंद्रशासित प्रदेश व अठरा जागतिक हेरिटेज ठिकाणे येथून प्रवास करत तीस हजार किमीचे अंतर पार करणार आहेत. त्या मुंबई, जयपूर, दिल्ली, स्पिती, श्रीनगर, आग्रा, सिलिगुडी, कोलकाता, भोपाळ, भुवनेश्वर, हैदराबाद, चेन्नई, कोची, कोइम्बतूर व बेंगळुरू असा प्रवास करणार आहेत आणि जून २०२१ मध्ये कोल्हापूर येथे राइडची सांगता करणार आहेत.
     व्यवसायाने इंटिरिअर डिझाइनर असणाऱ्या ३१ वर्षीय गायत्री यांनी आपली आवड पूर्ण करत देशातल्या निरनिराळ्या ठिकाणी रायडिंग करायला सुरुवात केली. त्यांनी २०१७ मध्ये राइड सुरू केल्या आणि आतापर्यंत त्यांच्या TVS Apache RTR 200 4V वरून जवळजवळ पासष्ट हजार किमी इतके अंतर पूर्ण केले आहे. यामध्ये कन्याकुमारी, भूतान, स्पिती व लेह येथील लांब पल्ल्याच्या राइडचा समावेश आहे. २०१९ मध्ये त्यांनी अंदमान व निकोबार बेटांवर राइड करणारी पहिली भारतीय स्त्री ठरून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *