‘रायडर मेनिया’मध्ये रॉयल रायडर्स कोल्हापूर क्लबचा पुन्हा एकदा दबदबा

Spread the love

• रायडर महेश चौगुले, यश सबनीस व मेहूल ठक्कर यांचे यश
कोल्हापूर • प्रतिनिधी
      BOBMC (ब्रदरहूड ऑफ बुलेटीअर्स मोटरसायकलींग कॉनसॉरटियम)च्यावतीने दरवर्षी मानाचा “रायडर मेनिया” हा उपक्रम घेतला जातो. यंदा हैदराबादमध्ये झालेल्या या इव्हेंटमध्ये रॉयल रायडर्स कोल्हापूर क्लबने पुन्हा एकदा यश मिळवून दबदबा निर्माण केला. या इव्हेंटमध्ये भारताच्या विविध राज्यांतील आणि परदेशातील बुलेट क्लब सहभागी होतात. फक्त निमंत्रित आणि निवडक क्लबना येथे सहभागी केले जाते.
       सलग ६ वर्षे रॉयल राइडर्सचे सदस्य या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्रत्येकवर्षी चांगले यश मिळवितात. हैदराबाद येथील इव्हेंटमध्ये सुमारे १५०० बुलेटस्वार वेगवेगळ्या राज्यातून व परदेशातून सहभागी झाले होते. कोल्हापूरच्या रॉयल राएडर्स या बुलेट ग्रुपने तीन प्रकारामध्ये बक्षीस पटकावले. यातील अत्यंत कठिण अशा टाइम ट्रायल या स्पर्धेत रॉयल राइडर्सच्या रायडरनी जबरदस्त यश मिळवले.
       ५००सीसी क्लासमध्ये क्लबचे अनुभवी रायडर महेश चौगुले यांनी दुसरा क्रमांक व
६५०सीसी क्लासमध्ये रायडर यश सबनीस यांनी दुसरा क्रमांक तर हिमालयन क्लासमध्ये रायडर मेहूल ठक्कर यांनी तिसरा क्रमांक पटकावला. यातील यश सबनीस आणि मेहूल ठक्कर यांनी प्रथमच रेसमध्ये सहभाग घेतला. मेहुल ठक्कर यांनी तर रेसमध्ये पडून जखमी झाल्यावरसुद्धा जिद्दीने रेस पूर्ण करून नंबर पटकाविला.
       या स्पर्धांमध्ये उतरण्यासाठी रायडर्सनी भरपूर प्रॅक्टिस केली होती. अलंकार गॅरेजचे अमोल माळी यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. क्लबचे अध्यक्ष जयदीप पवार यांचे मार्गदर्शन रायडरना लाभले. या इव्हेंटमध्ये क्लबच्या मानसिंग पाटील, संतोष धनवडे, धनंजय काटे, सुदर्शन खोत, महेश पाटील व परीक्षित सोहनी यांनी सहभाग नोंदविला. पुढीलवर्षी BOBMC चे आयोजन शिलाँग, मेघालय येथे करण्यात आले आहे.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!