शास्त्रीनगर क्रिकेट मैदानासाठी दोन कोटी रुपये देणार: पालकमंत्री सतेज पाटील

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शास्त्रीनगर क्रिकेट मैदानाची पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाहणी केली. मैदानाच्या विकासासाठी आणखी दोन कोटी रुपये देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
     कसबा बावडा आणि शास्त्रीनगर या दोन्ही मैदानाचे उद्घाटन चांगल्या खेळाडूच्या उपस्थित केले जाईल असेही त्यांनी यावेळी जाहीर केलें. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी विकेटची पहाणी ही केली.
      कबड्डी, बास्केटबॉल, टेबल टेनिस, मल्लखांब, बॅडमिंटन यासारख्या खेळांकरिता दहा कोटी रुपये खर्च करून शहरात इनडोअर स्टेडियम उभारला जाणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. देशातील अद्यावत फायरिंग रेंज विभागीय क्रीडासंकुल याठिकाणी केली जात असून यासाठी तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. शेंडा पार्क येथील जागेवर २५ कोटी रुपये खर्च करून जिल्हा क्रीडासंकुल उभारले जाणार आहे. तर छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील रिकाम्या जागेतही इनडोअर स्टेडियम उभारले जाणार आहे.
      यावेळी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, विद्यमान अध्यक्ष चेतन चौगुले, उपाध्यक्ष रमेश हजारे, केदार गयावळ, अभिजीत भोसले, जनार्दन यादव, संभाजी जाधव, नंदकुमार बामणे, संजय पठारे, किरण खतकर, काकासाहेब पाटील, संजय मोहिते, सुरेश ढोनुक्षे, विनायक सूर्यवंशी यांच्यासह निवड चाचणीत सहभागी झालेले खेळाडू खेळाडू उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!