सोशल डिस्टंन्सचे पालन न झाल्याने डी मार्टला ४ हजार रुपये दंड


कोल्हापूर • प्रतिनिधी
     सोशल डिस्टन्सचे पालन न झाल्याने रंकाळा चौपाटीजवळ असलेल्या डी मार्टवर कारवाई करण्यात आली. त्यांना ४ हजार रुपये दंड केला.
     राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्य शासनाने कोविड-१९वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध घालून शासनाचे नियमांचे पालन न झाल्यास कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. यासाठी महापालिकेने विविध भरारी पथके स्थापन केली असून या पथकामार्फत शहरामध्ये कारवाई सुरु आहे. सोमवारी (दि.२९) सहायक आयुक्त संदीप घार्गे, चेतन कोंडे यांनी रंकाळा चौपाटी व त्याठिकाणी असलेले खाऊचे स्टॉल व डी मार्ट याठिकाणी तपासणी केली. यावेळी डी मार्टमध्ये सोशल डिस्टंन्सचे पालन होत नसल्याने डी मार्टला रुपये ४ हजारचा दंड करण्यात आला. तसेच रंकाळा चौपाटी येथे विनामास्क फिरणाऱ्या ९४ नागरीकांच्यावरही कारवाई करुन ९ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर फुलेवाडी नाका येथील हॉटेल कृष्णा डिलक्स यांच्यावरही कारवाई करण्यात आली.
      यावेळी केएमटी पथकाकडील सुनिल जाधव, आरोग्य निरिक्षक राजेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने सदरची करवाई केली.
———————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *