ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अर्जुनवाड्यातच साजरे केले रक्षाबंधन


कोल्हापूर • प्रतिनिधी
     ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अर्जुनवाडा (ता.कागल) या गावातच रक्षाबंधन साजरे केले. ५० हून अधिक बहिणीनी आपल्या या लाडक्या भावाला अतुट भावबंधनाचा हा धागा बांधला.
     याबाबत अधिक माहिती अशी, अर्जुनवाडा येथील ग्रामदैवत श्री मरगाई देवी व श्री भैरवनाथ मंदिराच्या वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ गावात आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या आया-बहिणीनी त्यांचे पंचारतीने औक्षण करून राख्या बांधल्या.
     यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, गेल्या ४० वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत माता-भगिनींचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत. या पुण्याईच्या शिदोरीच्या जोरावरच नेहमीच यशस्वी होत आलो आहे. असेच आशीर्वाद आणि प्रेम माझ्यावर राहू द्या, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
                           दुग्धशर्करा योग…….
     भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा हा रक्षाबंधन सण. या सणादिवशीच अर्जुनवाडा ग्रामदैवत श्री मरगाईदेवी व श्री भैरवनाथ मंदिराचा कलशारोहण समारंभ म्हणजेच दुग्धशर्करा योग. असा दुर्मिळ योग जुळून आला. घाईगडबडीतही मंत्री मुश्रीफ यांना माता-भगिनींनी राखी बांधून एक अतूट नाते जपले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *