ऑक्सीजन कॉन्सेट्रेटससाठी आमदार फंडातून २५ लाखाचा निधी

Spread the love

 
कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांनी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी आमदार फंडातून २५ लाख रुपयांचा निधी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
      राज्य शासनाने खास बाब म्हणून आमदार निधीतून स्थानिक विकास निधीतून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक ऑक्सीजन कॉन्सेट्रेटस व औषध साधनसामुग्री खरेदीसाठी खर्च करण्यास सहमती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ती कोल्हापूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभाग तसेच जिल्हा आरोग्य विभागासाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी २५ लाखाचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!