कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन मेनन

Spread the love

• उपाध्यक्षपदी हर्षद दलाल यांची  फेरनिवड
कोल्हापूर • प्रतिनिधी
     येथील कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या सभेत सन २०२०-२१ करिता  असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन मेनन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
     तसेच उपाध्यक्षपदी हर्षद दलाल, सचिवपदी दिनेश बुधले, सहसचिवपदी प्रसन्न तेरदाळकर आणि  खजिनदारपदी कमलाकांत कुलकर्णी यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. स्विकृत संचालकपदी अभिषेक सावेकर व जयदिप मांगोरे यांचीही सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.
     संचालक श्रीकांत दुधाणे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.  
निवडीनंतर सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.
     माजी अध्यक्ष रणजीत शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीतील कामकाजाचा आढावा घेतला. कोरोनाकाळातही असोसिएशनचे काम आणि सर्व संचालकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
      नुतन अध्यक्ष सचिन मेनन यांनी भविष्यातील असोसिएशनच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. या वर्षात असोसिएशनचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टप्याटप्याने विविध कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने आयोजित करण्याचा मानस सचिन मेनन यांनी व्यक्त केला.
      माजी अध्यक्ष रणजीत शाह यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा उल्लेख करून   दिनेश बुधले यांनी त्यांचे अभिनंदन केले. कोरोनाकाळातही उद्यमवार्ताचे कामकाज उत्कृष्टपणे केल्याबद्दल मुख्य संपादक व संचालक नितीन वाडीकर यांचाही यावेळी पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. 
     असोसिएशनच्या श्री शाहू हाॅलमध्ये नविन प्रोजेक्ट उभारणे तसेच लिफ्टची सोय करण्यातबाबत चर्चा झाली. अमृतमहोत्सवी वर्षातील विविध कार्यक्रम व नियोजन करण्यासाठी  सचिव दिनेश बुधले यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करून कामकाज करण्याचे ठरले. यावेळी सर्वश्री सचिन मेनन, हर्षद दलाल, दिनेश बुधले, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, रणजीत शाह, श्रीकांत दुधाणे, बाबासोा कोंडेकर, नितीन वाडीकर, संजय अंगडी, अतुल आरवाडे, प्रदीप व्हरांबळे आदी उपस्थित होते.
———————————————– 2 Attachments

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!