कोल्हापूर • प्रतिनिधी
दि डिस्ट्रिक्ट हॉकी असोसिएशन, कोल्हापूरच्या अध्यक्षपदी सागर यवलुजे तर सचिवपदी सागर जाधव यांची निवड करण्यात आली. सागर यवलुजे हे हॉकी खेळाडू तर सागर जाधव हे हॉकी एनआयएस मार्गदर्शक आहेत.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे असोसिएशनच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत निवड करण्यात आली. बैठकीस माजी अध्यक्ष विजय साळोखे – सरदार, सुदाम तोरस्कर, नजीर मुल्ला, ताहिर शेख, सागर यवलुजे, सागर जाधव, जमिर शेख, रमेश चौगले उपस्थित होते.