सहकार सप्‍ताह निमित्‍य गोकुळमध्ये ध्वजारोहण

सहकार सप्‍ताह निमित्‍य गोकुळमध्ये ध्वजारोहण
कोल्‍हापूर • प्रतिनिधी
    भारत सरकारच्‍या आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण विभागामार्फत अन्‍न सुरक्षा कायद्याअंतर्गत शिक्षा व दंडाची मर्यादा वाढवून अत्‍यंत कडक अंमलबजावणी करण्‍यात येणार असून, सर्व दूध उत्‍पादक, दूध संस्‍था,दूध विक्रेते यांनी सतर्क राहून काम करणे आवश्‍यक असल्‍याचे गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व संचालक विश्‍वास पाटील (आबाजी) यांनी ६७ व्‍या सहकार सप्‍ताहनिमित्‍य आयोजित ध्‍वजारोहण कार्यक्रमावेळी सर्व अधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी अन्‍न सुरक्षा कायदा व नियमांची माहिती दिली.
     सहकार सप्‍ताहानिमित्त ध्‍वजारोहण गोकुळचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक विश्‍वास पाटील यांच्‍या हस्‍ते ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्‍या प्रांगणात करण्‍यात आले. यावेळी माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक बाळासो खाडे, उदय पाटील, कार्यकारी संचालक डी.व्‍ही.घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील,व्‍यवस्‍थापक डेअरी ए.वाय.चौधरी, व्‍यवस्‍थापक गुणनियंञण सुरज समुद्रे, गोकुळ नागरी सहकारी पतसंस्‍थेचे चेअरमन शशिकांत पाटील, गोकुळचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *