महाराष्ट्र क्रीडा, शाहू स्पोर्ट, देवगिरीसह छावा मित्र मंडळ पुढील फेरीत

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे दि डिस्ट्रिक्ट हॉकी असोसिएशन कोल्हापूर आयोजित साई चषक हॉकी स्पर्धेला प्रारंभ झाला. महाराष्ट्र क्रीडा मंडळ, राजर्षी छत्रपती शाहू ॲकॅडमी, देवगिरी फायटर्स, छावा मित्र मंडळ यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला.
     स्पर्धेचे उद्घाटन कुमार आगळगावकर, अमित शिंदे, मिलिंद रजपूत यांच्या हस्ते झाले. यावेळी नजीर मुल्ला, सीताराम अर्दळकर, गणेश पोवार, रणजीत इंगवले आदी उपस्थित होते. स्पर्धेमध्ये एकूण आठ संघांनी सहभाग घेतला आहे. 
     स्पर्धेमधील पहिला सामना राजर्षी छत्रपती शाहू अॅकॅडमी विरुद्ध सरदार स्पोर्ट ग्रुप यांच्यामध्ये होऊन शाहू स्पोर्ट अॅकॅडमीने २ विरुद्ध १ गोलने विजय संपादन केला. सरदार स्पोर्टकडून आदित्य पाटील तर शाहू अॅकॅडमीच्या पारस पाटील व शुभम डुबल यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.
     देवगिरी फायटर्स विरुद्ध संजीवन ग्रुप स्कूल(अ) यांच्यातील सामना देवगिरी फायटर्स ने ३ विरुद्ध १ गोलने  जिंकला. संजीवनकडून ओंकार पाटील  तर देवगिरी फायटर्सकडून आयान सनदे व निशांत साळी यांनी गोल केले.
      छावा मित्र मंडळ विरुद्ध संजीवन ग्रुप ऑफ स्कूल(ब) हा सामना १-१ गोल असा बरोबरीत राहिल्यामुळे पेनल्टी स्ट्रोकचा अवलंब करण्यात आला. त्यामध्ये छावा संघाने ३ विरुद्ध १ गोलने मात केली.
      महाराष्ट्र क्रीडा मंडळ विरुद्ध देवगिरी फायटर्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात महाराष्ट्र क्रीडा मंडळाने ५-० असा एकतर्फी विजय मिळवला. तन्मय जाधवने ३ गोल तर अनिरुद्ध पाटील व प्रणव चौगुले यांनी प्रत्येकी गोल नोंदविला.
       सामन्यांसाठी पंच म्हणून योगेश देशपांडे, गणेश पवार, सागर जाधव, सागर पोळकर, शुभम पाटील यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!